23 वर्षीय तरुणीवर अत्याचार व गर्भपात : एकाविरोधात गुन्हा
अमळनेर : अमळनेर शहरातील एका भागातील 23 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला व त्यातून ती गर्भवती राहिल्यानंतर गर्भपात करण्यास सांगून मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण
23 वर्षीय तरुणी कुटुंबासह वास्तव्याला आहे. संशयित आरोपी रत्नाकार सुभाष पाटील याने तरूणीवर अत्याचार करून तिला गर्भवती केले. त्यानंतर गर्भपात करून तिला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली.

हा प्रकार सन 2021 पासून सुरू होता. हा प्रकार सहन न झाल्याने तरूणीने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी रत्नाकर सुभाष पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप करीत आहेत.
