धरणगावातील जिनिंग व्यावसायिकाला 86 लाखांचा गंडा : त्रिकूटाविरोधात गुन्हा


धरणगाव (21 ऑक्टोबर 2024) : धरणगावातील एका जिनिंग व्यावसायिकाची तब्बल 86 लाख 96 हजार 778 रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असे आहे फसवणूक प्रकरण
धरणगाव येथील वल्लभ जिनिंगचे मालक हरीश सुभाष अग्रवाल (वय 47), यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 24 ऑगस्ट 2022 ते 20 मार्च 2024 च्या दरम्यान ब्रोकर भावेश शहा (रा.कोईम्बतूर (तामिळनाडू), रंजीता इंटरप्रायझेस रायचूरचे मालक भाव्या नायक आणि पायोनियर इंटरप्रायझेस रायचूरचे मालक बबीता संचेती यांनी सर्वांनी संगनमताने आपला विश्वास संपादन केला. त्यानंतर 26 ऑगस्ट 2022 रोजी पाठवलेले 110 रूई गठाण व दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी पाठवलेले 100 रूई गठाण असा माल घेवुन एकुण 86 लाख 96 हजार 778 रुपयांची फसवणूक केली.

वारंवार पैशांची मागणी करून देखील पैसे न मिळाल्याने अग्रवाल यांनी धरणगाव पोलिसात अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले करीत आहेत. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची तजवीज देखील पोलिसांनी ठेवली आहे. दरम्यान, तक्रारदार यांनी माल पाठवले बाबतची बिले, तसेच तक्रारदाराने ज्या गाडीत माल पाठवला त्याचे फोटो, माल पाठवश्रल्याचे इ-मेलची प्रत, गाडीत माल भरून पाठवलेचे वजन काटा पावत्या इतर कागदपत्र पोलिसांना सादर केली आहेत.

 


कॉपी करू नका.