बडनेरा रेल्वे यार्डातील कामासाठी चार गाड्या शॉर्ट टर्मिनेट

नाशिक-बडनेरा मेमू मूर्तिजापूरपर्यंत धावणार !


भुसावळ (21 ऑक्टोबर 2024) : भुसावळ विभागातील बडनेरा येथील यार्ड रीमॉडेलिंगच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून चार गाड्या शॉर्ट 19 ते 25 ऑक्टोबर या काळात शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्याने प्रवाशांची दिवाळीच्या काळात गैरसोय होणार आहे.

भुसावळ विभागातील बडनेरा रेल्वे यार्डातील रीमॉडेलिंगचे काम 19 ते 25 ऑक्टोबर या दरम्यान केले जात आहे. यामुळे बडनेरा येथे जाणार्‍या मेमू गाड्या या मूर्तिजापूर व अमरावती येथे शॉर्ट टर्मिनेट केल्या आहे. 01212 नाशिक रोड-बडनेरा मेमू विशेष गाडी मूर्तिजापूर येथे शॉर्ट टर्मिनेट, 01365 भुसावळ-बडनेरा मेमू मूर्तिजापूर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. 01368 नरखेड-बडनेरा मेमू नवी अमरावती येथे शॉर्ट टर्मिनेट, 01370 नरखेड-बडनेरा मेमू नवी अमरावती येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाणार आहे. परतीच्या प्रवासात या गाड्या ज्या रेल्वे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट केल्या आहे. तेथून त्या गाड्या सुटणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


कॉपी करू नका.