नाकाबंदीदरम्यान सापडली दीड कोटी रुपयांची रोकड : कासोदानजीक पोलिसांची नाकाबंदीत कारवाई
जळगाव (23 ऑक्टोबर 2024) : एका कारमधून पोलिसांनी दीड कोटींची रोकड जप्त केल्याची घटना समोर आल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यात अलीकडेच पाच कोटी रुपयांची रोकड सापडल्याची घटना समोर आल्यानंतर विविध चर्चा व आरोपांच्या फैरी झडत असताना आता कासोद्याजवळ मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नाकाबंदीदरम्यान एका क्रेटा कारमधून एक कोटी 45 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
जिनिंग व्यापार्याची रोकड ?
कासोद्याचे सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणेकडून नाकाबंदीदरम्यान एका वाहनातून रोकड जप्त करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही रोकड नेमकी कोणाची आणि कशासाठी आणली होती ? याची चौकशी केली असता ही रोकड एका जिनिंग व्यापार्याशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. यंत्रणेने आयटी विभागाला या प्रकरणी सूचित केले असून पुढील कारवाई सुरू आहे.

