दाना चक्रीवादळाचा फटका : भुसावळ विभागातून धावणार्या पाच रेल्वे गाड्या रद्द
Cyclone Dana hit : Five trains running through Bhusawal section are cancelled भुसावळ (24 ऑक्टोबर 2024) : ऐन सणासुदीत आलेल्या ‘दाना’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे भुसावळ विभागातून धावणार्या पाच रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ओरीसा मधील पूर्व तटीय रेल्वे येथे दाना चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने पाच गाड्या रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ऐनवेळी रेल्वे गाडी रद्द झाल्याने प्रवाशांची प्रवासासाठी मोठीच गैरसोय झाली तर अन्य गाड्यांच्या तिकीट शोधार्थ प्रवासी आहेत.
या गाड्या झाल्या रद्द
23 ऑक्टोबरला गांधीधाम येथून सुटणारी गांधीधाम-पुरी (22973) एक्सप्रेस, 24 ऑक्टोबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी एक्सप्रेस (22865), 29 ऑक्टोबर रोजी पुरी येथून सुटणारी पुरी-अजमेर एक्सप्रेस (20824), 26 ऑक्टोबर रोजी पुरी येथून सुटणारी पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस (22974) एक्स्प्रेस तसेच 25 ऑक्टोबरला ब्रह्मपूर येथून सुटणारी ब्रह्मपूर-उधना विशेष एक्स्प्रेस (09060) रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना दाना चक्री वादळाची माहिती लक्षात ठेऊन नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे.

