चोपड्यात नाकाबंदी दरम्यान 30 लाखांची रोकड जप्त
चोपडा (24 ऑक्टोबर 2024) : चोपडा येथे नाकाबंदी दरम्यान 30 लाख रोकड जप्त करण्यात आल्यांतर खळबळ उडाली. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पोलीस प्रशासनाकडून नाकाबंदीदरम्यान वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
वाहन जळगावकडे जाताना कारवाई
चोपडा येथील तिरंगा चौक, श्रीनाथ प्राईड येथे होंडाई व्हेन्यू कंपनीची गाडी (क्रमांक एम.पी.09 सी.के. 7474) मध्ये 30 लाख रुपये आढळल्याने ही रोकड जप्त करण्यात आली. इम्रान अल्लाउददीन मन्सुरी (44, रा.बलवाडी, ता.वरला, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) व अजय अरुण पाटील (32, रा.जयहिंद कॉलनी, चोपडाा) हे रक्कम जळगावकडे चोपडा मार्गे जात असतांना तिरंगा चौकात श्रीनाथ प्राईड हॉटेलसमोर आढळले. याबाबत सविस्तर पंचनामा करण्यात आले आहे.

सदर रोकड कुठून कुठे घेऊन जात होते आणि ही रोकड कोणाची ? हिचा खरा मालक कोण ? याबाबत शहरात जोरात चर्चा असून याची कसून चौकशी पोलीस करीत आहे. ही रक्कम उपकोषागार कार्यालयात जमा करण्यात येईल, असे निवडणूक अधिकारी पाटोळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यांनी केली कारवाई
चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार) तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी, चोपडा आण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, एपीआय एकनाथ भिसे, उपनिरीक्षक अनिल भुसारे, जितेंद्र वालटे, विजय देवरे, योगेश्वर हिरे, जितेंद्र सोनवणे, हवालदार संतोष पारधी, हवालदार शिपी, हवालदार ज्ञानेश्वर जवागे, नाईक संदीप भोई, प्रकाश मथुरे, प्रमोद पवार, विनोद पाटील, अमोल पवार, मदन पावरा, रजनीकांत भास्कर, अक्षय सुर्यवंशी, समा तडवी यांनी ही कारवाई केली आहे.
