भुसावळ शहरात 24 वर्षीय विवाहितेचा खून : संशयीत पती मनमाडमधून अटक


भुसावळ (30 ऑक्टोबर 2024) : शहरातील 24 वर्षीय विवाहितेचा डोक्यावर धारदार शस्त्राने वार करीत पतीनेच खून केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी शहरातील द्वारका नगरात घडली. वर्षा अजय गुंजाळ (24) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे तर पोलीस यंत्रणेचा संशय महिलेचा पती अक्षय गुंजाळ याच्यावर आहे. दाम्पत्यात कुठल्यातरी कारणातून वाद झाला असावा व त्यातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, पसार होण्याच्या प्रयत्नातील आरोपी पतीला मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.

खुनाच्या घटनेमुळे शहरात खळबळ
शहरातील द्वारका नगरात खून झाल्याची माहिती कळताच डीवायएसपी कृष्णात पिंगळे, शहरचे पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे, उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अत्यवस्थ अवस्थेत महिलेस ट्रामा केअर सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले असता महिलेस वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. धनत्रयोदशीच्या दिवशी झालेल्या या प्रकाराने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत महिलेचे विच्छेदन बुधवारी ग्रामीण रुग्णालयात होईल. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. संशयीताचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.


कॉपी करू नका.