छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह लिखाण : आक्षेपार्ह विधान करणार्यास चोपले
चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण आणि विधानं करणार्या इसमास शिवप्रेमींनी चांगलाच चोप दिला. शिवाजी महाराजांपेक्षा औरंगजेब श्रेष्ठ होता, असं विधान या इसमाकडून सातत्याने सोशल मिडीयावर केलं जात होतं. फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण करणार्या या इसमाचं नावं जितेंद्र राऊत असं असून अनेकदा फेसबुकवर राऊत याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल खालच्या भाषेत शब्दप्रयोग केले होते. त्याच्या पोस्टवर येणार्या प्रतिक्रियेवरही जितेंद्र राऊत हा चिथावणीखोर विधान करत होता. शिवप्रेमींना अनेकदा जितेंद्र राऊतांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र राऊत याने लिखाण करणं सोडलं नाही.खालच्या पातळीवरील भाष्य जितेंद्र राऊताने केलं होतं. या सर्वाचा परिणाम म्हणून संतप्त शिवप्रेमींना या इसमाला पकडून चोप दिला.