जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 41 टक्के मतदान
मुक्ताईनगर, जामनेर, रावेरसह चाळीसगाव व जळगाव ग्रामीणमध्ये सर्वात जास्त मतदान
जळगाव (बुधवार, 20 नोव्हेंबर 2024) : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी सात वाजेपासून मतदानाला उत्स्फूर्तपणे सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील 11 मतदारसंघात सकाळी साते तीन वाजेपर्यंत 40.62 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
मतदार संघनिहाय टक्केवारी

चोपडा- 47.04
रावेर- 49.16
भुसावळ- 39.93
जळगांव शहर- 29.3
जळगांव ग्रामीण- 44.88
अमळनेर- 39.34
एरंडोल- 41.61
चाळीसगाव- 43.15
पाचोरा- 31.37
जामनेर- 42.32
मुक्ताईनगर- 42.51