कोरोना : 31 मार्चपर्यंत सर्व रेल्वे गाड्या रद्द
नवी दिल्ली : देशभरात धुमाकूळ घालणार्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 31 मार्चपर्यंतच्या सर्व प्रवासी गाड्या रेल्वे मंत्रालयानं रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक्स्प्रेस, पॅसेंजर, इंटरसिटी अशा सर्व गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत. या दिवसांमध्ये केवळ मालगाड्या सुरू राहतील.
मध्यरात्रीपासून लाईफलाईन बंद
मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली लोकल सेवादेखील आज मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

