कन्हाळा शिवारात तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळला
भुसावळ (3 डिसेंबर 2024) : भुसावळ कन्हाळे शिवारात 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी आढळल्याने खळबळ उडाली आहे. कन्हाळे शिवारात बाळू नामदेव भोळे यांची शेती असून त्यांच्या शेताशेजारी कुजलेल्या स्थितीतील तरुणाचा मृतदेह आढळला आहे.
तालुका पोलिसांची धाव
या घटनेची माहिती भुसावळ तालुका पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच तालुका पोलीस लागलीच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह भुसावळातील ट्रामा केअर सेंटर येथे रवाना केला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश दराडे हे करीत आहे.