देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब : उद्या शपथविधी


Devendra Fadnavis’ name confirmed : Swearing-in ceremony tomorrow मुंंबई (4 डिसेंबर 2024) : देवेंद्र फडणवीस यांची विधी मंडळ गटनेता पदी निवड झाल्यानंतर त्यांची मुख्यमंत्री निवड निश्चित असून गुरुवार, 5 रोजी ते राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार ? याबाबत खल सुरू असताना आता देवेंद्र यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

भाजपा कोअर कमेटीच्या बैठकीत निर्णय
भाजपची कोर कमिटीची बैठक संपली आहे. निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. भाजपा विधी मंडळ गटनेते पदी फडणवीस यांच्या नावाला भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनीदेखील अनुमोदन दिले.

फडणवीसच होणार मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री म्हणून भाजपने जवळपास निश्चित केलं होतं. परंतु एकनाथ शिंदे यांच्या कथित नाराजीमुळे भाजपने त्यांचं नाव जाहीर केलेलं नव्हतं. शेवटी शिंदेंनी गृहमंत्री पदाची मागणी लावून धरली होती. त्याबाबत भाजप काय निर्णय घेणार, हे लवकरच कळेल. मात्र मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच शपथ घेतील, हे निश्चित झालं आहे.

10 हजार लाडक्या बहिणींची असेल उपस्थिती
महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या ‘लाडक्या बहिणी’ शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. शपथविधीच्या ठिकाणी ‘लाडकी बहीण कक्ष’ उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी 10 हजार महिलांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


कॉपी करू नका.