जळगाव जिल्ह्यातील सेवानिवृत्त लिपिकाला 18 लाखांचा गंडा
Retired clerk in Jalgaon district cheated of Rs. 18 lakhs जळगाव (9 डिसेंबर 2024) : एका शिक्षण संस्थेतून निवृत्त झालेल्या लिपिकाला भामट्यांनी 18 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
असे आहे प्रकरण
19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान राहुल गुप्ता व त्याचा असिस्टंट संदीप राव असे नाव सांगणार्यांनी संपर्क साधत व गुन्ह्याची धमकी देत न्यायालयाची खोटी ऑर्डर व इतर खोटे कागदपत्रे त्यांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविले त्यामुळे निवृत्त कर्मचारी घाबरला व त्याच्याकडे समोरील व्यक्तींनी ऑनलाइन पैसे पाठविण्याची मागणी केली त्यामुळे वेळोवेळी निवृत्ताने एकूण 18 लाख रुपये आरटीजीएसद्वारे भरले. याप्रकरणी भामट्यांविरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


