मुंबईत मास्कचा काळाबाजार उघड : 25 लाख मास्क जप्त


मुंबई : मुंबईतील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांच्यासाठी आलेल्या मास्कचा साठा करणार्‍यांवर कारवाई करीत तब्बल सुमारे 20 ते 25 रुपये कोटी रुपये किंमतीचे 25 लाख मास्क जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईच्या जुहू परीसरात मास्कचा साठेबाजार करणार्‍यांवर ही कारवाई करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन परीस्थिचीचा आढावा घेतला. मास्कचा साठेबाजार कुणी केला आणि अजून मास्कचा साठा केलाय का याची माहिती आता पोलीस घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी पोलिसांना मास्कच्या साठेबाजाराबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर मुंबईचे आयुक्त परमबीर सिंह यांनी स्वत: लक्ष घालून ही मोठी कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !