85 लाखांचे फसवणूक प्रकरण : तृप्ती मुळीक पोलिस खात्यातून निलंबित
85 lakh fraud case : Trupti Mulik suspended from police department सिंधुदुर्गनगरी (14 डिसेंबर 2024) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार उदय सामंत अशा अतिमहनीय व्यक्तींना असलेल्या डीव्ही कारची वाहन चालक म्हणून केलेल्या कामामुळे तृप्ती मुळीक प्रकाशझोतात आली मात्र कोल्हापूरातील 85 लाखांच्या फसवणूक प्रकरणात तिचा हात असल्याचे निष्पन्न होताच तिला पोलिस दलातून निलंबित करण्यात आले आरोपी तृप्तीला कोल्हापूर येथील न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावताच सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षकांनी निलंबन आदेश काढले.
काय आहे नेमके प्रकरण
गंगावेश कोल्हापूर येथील सुभाष हरी कुलकर्णी यांनी कोल्हापूर पोलिस ठाण्यात आपल्याला झालेल्या फसवणूक प्रकरणाबाबत 3 नोव्हेंबर 2024 रोजी तक्रार दाखल केली आहे. एकूण नऊ संशयितांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात सिंधुदुर्ग पोलिस अंमलदार असलेल्या तृप्ती संजय मुळीक (32 रा. मूळ दरवेश पाडळी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर व सध्या राहणार सिद्धिविनायक पार्क, दुसरा मजला, ओरोस) या सहा नंबरच्या संशयित आरोपी आहेत.

तृप्ती मुळीक हिच्यासह दीपक पाटणकर, अण्णा उर्फ नित्यानंद नायक, धनश्री काळभोर, शशिकांत गोळे, कुंडलिक झगडे, ओमकार पाटणकर, भारत पाटणकर, हरीश राऊत असे एकूण नऊ आरोपी आहेत. या सर्वांवर भादवि. कलम 384, 386, 419, 420, 34 सह नरबळी इतर अमानूष अघोरी प्रथा व जादुटोणा आदीचा वापर करून 84 लाख 69 हजार रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

