ओबीसी नेते छगन भुजबळांची गच्छंती : फडणवीसांच्या मंत्री मंडळात 19 नव्या चेहर्यांना स्थान
OBC leader Chhagan Bhujbal’s resignation : 19 new faces in Fadnavis’ cabinet नागपूर (15 डिसेंबर 2024) : नागपूरातील शपथविधीत अनेकांना लॉटरी लागली मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या यादीत छगन भुजबळ यांना डच्चू देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, फडणवीस यांनी आता 19 नव्या चेहर्यांना मंत्री मंडळात स्थान दिले आहे.
यांनाही वगळले
मंत्र्यांच्या यादीत दिलीप वळसे, धर्मराव अत्राम, अनिल पाटील यांनांही मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारले असता त्यांनी अजित पवार यांच्याकडे चेंडू टोलावला तर अजित पवारांनीही उरलेल्या दोन नावांवर बोलण्यास नकार दिला. मंत्री ठरवायचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आहे, असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिली.
या नव्या चेहर्यांना भाजपाकडून संधी
नितेश राणे- भाजप
माधुरी मिसाळ- भाजप
जयकुमार गोरे- भाजप
शिवेंद्रराजे भोसले- भाजप
मेघना बोर्डीकर- भाजप
पंकज भोयर- भाजप
आकाश फुंडकर- भाजप
अशोक उईके- भाजप
संजय सावकारे- भाजप
राष्ट्रवादीचे नवे चेहरे
नरहरी झिरवळ- राष्ट्रवादी
मकरंद जाधव पाटील- राष्ट्रादी
बाबासाहेब पाटील- राष्ट्रवादी
इंद्रनील नाईक- राष्ट्रवादी
शिवसेनेकडील नवे चेहरे
प्रताप सरनाईक- शिवसेना
भरत गोगावले-शिवसेना
योगेश कमद- शिवसेना
प्रकाश आबीटकर- शिवसेना
संजय शिरसाट शिवसेना
आशिष जैस्वाल- शिवसेना