गुलाबराव पाटील यांना तिसर्‍यांदा संधी : नागपूरात घेतली मंत्री पदाची शपथ


नागपूर (15 डिसेंबर 2024) : जळगावचे माजी पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना महायुती सरकारमध्ये मंत्री पद देण्यात आले असून त्यांनी नागपूर विधान भवनात आज तिसर्‍यांदा शपथ घेतली.

शिंदे गटाचे दमदार आमदार
गुलाबराव पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या एरंडोल मतदारसंघातून 1999 मधून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2004 मध्ये एरंडोल मतदारसंघातून ते दुसर्‍यांदा निवडून आले. त्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर त्यांनी जळगाव ग्रामीण मधून 2009 निवडणूक लढवली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांनी त्यांना पराभूत केले होते. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडून येऊन तिसर्‍यांदा आमदार झाले. त्याच कार्यकाळात त्यांना राज्यमंत्री करण्यात येऊन सहकार खाते मिळाले होते. त्यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर 2019 मध्ये ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आणि पाणीपुरवठा खाते देखील त्यांच्याकडे सोपविण्यात आले.

दरम्यान गेल्या महिन्यात झालेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले. सलग तिसर्‍यांदा आणि आमदार म्हणून पाचव्यांदा निवडून आलेले गुलाबराव पाटील हे आज नागपूर येथे मंत्री मंडळ विस्तारात तिसर्‍यांदा मंत्री म्हणून शपथ घेतली.


कॉपी करू नका.