आमदार गिरीश महाजन यांनी तिसर्यांदा घेतली मंत्री पदाची शपथ
नागपूर (15 डिसेंबर 2024) : जामनेर मतदारसंघाचे आमदार गिरीश महाजन यांनी आज रविवारी सायंकाळी नागपूरात सलग तिसर्यांदा मंत्री पदाची शपथ घेतली.
सातव्यांदा झाले आमदार
जामनेर मतदारसंघातून सलग सातव्यांदा गिरीश महाजन हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात त्यांनी पहिल्यांदा मंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांच्याकडे जलसंपदा हे खाते होते. 2019 च्या विधानसभेत निवडून आल्यानंतर महायुती सरकारच्या काळात गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी दुसर्यांदा मंत्रिपद भूषवित आरोग्य शिक्षण मंत्री याची धुरा सांभाळली. त्यानंतर त्यांच्याकडे ग्रामविकास मंत्रीपद देखील देण्यात आले.
गत महिन्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा सातव्यांदा विजय झालेला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची निवड झाल्यानंतर नागपूर येथे मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत आहे. या मंत्रिमंडळात गिरीश महाजन यांनी देखील कॅबिनेट मंत्री म्हणून आज तिसर्यादा शपथ घेतली.