रेल्वे रुळावर पोलिसाचा मृतदेह आढळला : अडावद पोलिस ठाण्यात होते कार्यरत


अमळनेर (15 डिसेंबर 2024) : चोपडा तालुक्यातील अडावद पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी संजय आत्माराम पाटील (51) यांचा मृतदेह अमळनेर-टाकरखेडा दरम्यान रेल्वे रुळावर छिन्नविछिन्न अवस्थेत गुरुवार, 12 डिसेबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आढळला आहे.

शनिवार, 14 डिसेंबर रोजी चोपडा शहर पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पाटील यांच्या कुटूबिंयानी मृतदेहाची ओळख पटवली. मृतदेहाच्या कपड्यांवरून व चप्पलावरून पोलिस कॉन्स्टेबल संजय पाटील यांचा मृतदेह असल्याचे त्यांच्या पत्नीने ओळखले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तपास पोलिस हवालदार गणेश पाटील करीत आहेत.


कॉपी करू नका.