प्रत्येक मंत्र्यांच्या कामाचे होणार ऑडीट ; अडीच वर्षांसाठी संधी : जाणून घ्या कॅबिनेट व राज्य मंत्र्यांची नावे


न्यूज नेटवर्क । नागपूर (15 डिसेंबर 2024) : महायुती सरकारच्या प्रत्येक मंत्र्यांच्या कामाचे ऑडीट केले जाईल शिवाय दोन दिवसात खाते वाटप निश्चित होईल, असे मुख्यमंत्री नागपूरात पत्रकार परिषदेत म्हणाले. अनेक प्रश्नांना त्यांनी यावेळी दिलखुलासपणे उत्तरे दिली.

केवळ अडीच वर्ष मंत्री पद : चार बहिणींना संधी
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्री मंडळाचा विस्तार रविवारी नागपूरच्या राज भवनात झाला. महायुती सरकारमधील एकूण 39 आमदारांनी शपथ घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, अडीच वर्षांसाठी हे मंत्री पद असेल व त्याबाबत आमदारांच्या स्वाक्षर्‍याही घेण्यात आल्या आहेत. 33 कॅबिनेट तर सहा राज्यमंत्री मंत्री मंडळात असणार आहे शिवाय मंत्री मंडळात चार लाडक्या चार बहिणींना संधी मिळाली. पंकजा मुंडेंसह आदिती तटकरे यांना दुसर्‍यांदा तर मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ हे दोन नवे चेहरे मंत्री मंडळात आले आहेत.

हे आहेत कॅबिनेट मंत्री

1. चंद्रशेखर बावनकुळे
2. राधाकृष्ण विखे पाटील
3. हसन मुश्रीफ
4. चंद्रकांत पाटील
5. गिरीश महाजन
6 .गुलाबराव पाटील
7. गणेश नाईक
8. दादाजी भुसे
9. संजय राठोड
10. धनंजय मुंडे
11. मंगलप्रभात लोढा
12. उदय सामंत
13. जयकुमार रावल
14. पंकजा मुंडे
15. अतुल सावे
16. अशोक उईके
17. शंभूराज देसाई
18. आशिष शेलार
19. दत्तात्रय भरणे
20. अदिती तटकरे
21.शिवेंद्रराजे भोसले
22. माणिकराव कोकाटे
23. जयकुमार गोरे
24. नरहरी झिरवाळ
25.संजय सावकारे
26. संजय शिरसाट
27. प्रताप सरनाईक
28. भरत गोगावले
29. मकरंद पाटील
30. नितेश राणे
31. आकाश फुंडकर
32. बाबासाहेब पाटील
33. प्रकाश आबिटकर

राज्यमंत्री
34. माधुरी मिसाळ
35. आशिष जयस्वाल
36. तुषार राठोड
37. मेघना बोर्डीकर
38. इंद्रनील नाईक
39. योगेश कदम


कॉपी करू नका.