गुलाबराव पाटलासंह गिरीष महाजन व संजय सावकारेंनी घेतली कॅबीनेट मंत्री पदाची शपथ : आता खाते वाटपाकडे लक्ष
जळगाव (15 डिसेंबर 2024) : जळगाव जिल्ह्याला चार मंत्री पदे मिळणार असल्याची चर्चा असलीतरी प्रत्यक्षात मात्र तीनच तीन आमदारांना मंत्री मंडळात स्थान मिळाले तर अमळनेरच्या आमदारांना मात्र मंत्री मंडळात आता स्थान मिळाले नसलेतरी आगामी विस्तारात त्यांना संधी शक्य आहे. दरम्यान, जळगाव भाजपा कार्यालयाबद्दल शपथविधीनंतर जल्लोष करण्यात आला.
तीन आमदारांना कॅबिनेट मंत्री पद
गुलाबराव पाटील यांच्या गळ्यात सलग चौथ्यादा मंत्रीपदाची माळ पडली आहे. गिरीषभाऊ महाजन यांना तिसर्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाली तर भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना दुसर्यांदा मंत्रीपद मिळाले आहे.
नव्या शिलेदारांची अशी चमकदार कामगिरी
गुलाबराव पाटील-
शिवसेना शिंदे गटाचे पहिल्या फळीतील नेते आहेत. विधानसभा निवडणुकीच्या एरंडोल मतदारसंघातून मधून 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2004 मध्ये एरंडोल मतदारसंघातून ते दुसर्यांदा निवडून आले.मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर त्यांनी जळगाव ग्रामीणमधून 2009 मध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांनी त्यांना पराभूत केले होते पण 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गुलाबराव पाटील यांनी निवडून येऊन तिसर्यांदा आमदार म्हणून संधी मिळवली.या टर्ममध्ये त्यांना राज्यमंत्री म्हणून सहकार खाते व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली होती. दरम्यान, गेल्या कालखंडात उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे या दोन्हीच्या मंत्रीमंडळात त्यांना पुन्हा कॅबिनेट मंत्री पद मिळाले होते. ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच सलग पाच वर्ष पालकमंत्री पद त्याच्याकडे होते. या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा मोठ्या मताधिक्यांनी ते विजयी झाले. आता त्यांनी सलग तिसर्यांदा मंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांनी आज नागपूर येथे मंत्रीमंडळ विस्तारात शपथ घेतली. यावेळी त्यांना कोणते खाते मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
गिरीशभाऊ महाजन-
जामनेर मतदारसंघातून सलग सातव्यादा आमदार म्हणून विजयी होऊन जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे प्रभावी नेते म्हणून पकड गिरीशभाऊ महाजन यांची सुद्धा कॅबिनेट मंत्री वर्णी लागली आहे.राज्याच्या राजकारणातील संकटमोचक तसेच मुख्यमंत्री ना .देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीषभाऊ महाजन यांनी पाचव्या क्रमांकावर शपथ घेऊन आपले स्थान दाखवून दिले. महायुतीच्या या मंत्रिमंडळात अत्यंत महत्वाचे खाते दिले जाईल,असे म्हटले जात आहे.
संजयभाऊ सावकारे-
आ.संजयभाऊ सावकारे भुसावळ या राखीव विधानसभा मतदार संघातून सलग चार वेळा विजयी झाले आहेत. पहिल्यांदाच निवडून येऊन सुद्धा त्यांना तत्कालीन राष्ट्रवादी सरकारच्या काळात 2013-14 मध्ये राज्य मंत्रीपदाची संधी मिळाली होती. त्यावेळी सावकारे यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद सुद्धा आले होते. यानंतर झालेल्या उलथा-पालथमध्ये त्यांनी भाजपात प्रवेश करून सलग तीन वेळा विजय मिळवला. सावकारे अत्यंत शांत व संयमी स्वभाव असलेले नेते आहेत. त्यांना सुद्धा कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली आहे.