भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना कॅबिनेट मंत्री पद : युवा मोर्चा पदाधिकार्‍यांचा जल्लोष


भुसावळ (17 डिसेंबर 2024) : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री पदाची संधी देण्यात आल्यानंतर भुसावळातील भाजपासह भाजपा युवा मोर्चा पदाधिकार्‍यांनी रविवारी सायंकाळी प्रभाग क्रमांक 13 मध्ये शपथविधी नंतर शहरात जल्लोष केला. युवा मोर्चा पदाधिकार्‍यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आमदारांचा जयघोष केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी श्री फाउंडेशन अध्यक्ष सारंगधर पाटील (छोटू भाऊ), युवा मोर्चा खजिनदार मनिष सारंगधर पाटील, अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे, अनिरुद्ध कुलकर्णी, रुपेश देशमुख, गोपी राजपूत, चेतन सावकारे, चेतन जैन, किरण मिस्तरी, यशांक पाटील, राजु साळूंखे, तुषार चंदन, अभय सपकाळे, सोनू सपकाळे, गौरव फेगडे, पटेल बाबूजी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरात आता नवे विकासपर्व
शांत व संयमी असलेल्या आमदार संजय सावकारे यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याने शहरात आता विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे. आमदार सावकारे हे सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर नव्या इतिहासाची निर्मिती झाली आहे व आता आमदारांना कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याने प्रत्येक भुसावळकरांसाठी ही बाब अभिमानास्पद असल्याचे श्री फाउंडेशन अध्यक्ष सारंगधर पाटील यांनी सांगितले.


कॉपी करू नका.