विरवाडे हादरले : मित्रांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू : तिघांविरोधात खुनाचा गुन्हा
चोपडा (29 डिसेंबर 2024) : मित्राची बदनामी केल्याच्या संशयातून तिघा मित्रांनी मारहाण केल्याने 31 वर्षीय तरुणाचा मृत्यू ओढवला. चोपडा तालुक्यातील विरवाडे गावात ही घटना शुक्रवार, 27 रोजी सायंकाळी सात वाजता ही घटना बहिराम बाबा ठिकाणाजवळ घडली. दादा बारकू ठाकूर (31, विरवाडे, ता.चोपडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
काय घडले नेमके ?
रजूबाई बारकू ठाकूर (54, विरवाडे) यांच्या तक्रारीनुसार, संशयीत दिनेश मधुकर कोळी यांच्या काकाकडे दादा ठाकूर याने दिनेश हा मित्रांसोबत दारू पार्ट्या करतो व मित्रांना दारू पाजतो, असे बोलल्याचा संशय होता व त्यावरून शुक्रवारी सायंकाळी तिघा संशयीतांनी बहिराम बाबा ठिकाणाजवळ दादाच्या डोक्यात शिंगाड्याने (लाकडी दांडका) मारहाण केली. त्यात दादा ठाकूर गंभीर जखमी झाला व त्यास जळगावच्या आयकॉन हॉस्पीटलमध्ये हलवल्यानंतर शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू ओढवला.










