जळगावला सांस्कृतिक शहर बनवण्यात ‘परिवर्तन’चा मोठा वाटा : आमदार राजुमामा भोळे

जळगाव शहरात परिवर्तनच्या महोत्सवाचा समारोप


न्यूज डेस्क । जळगाव (30 डिसेंबर 2024) : परिवर्तन ही सतत सांस्कृतिक कार्य करणारी संस्था असून शहर सांस्कृतिक करण्याचं काम परिवर्तन करीत असल्याचं मत आ. राजू मामा भोळे यांनी मैत्र महोत्सवाचा समारोप करताना केले. नऊ दिवसांचा महोत्सव भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन व परिवर्तन जळगाव यांच्या वतीने भाऊंच्या उद्यानात मैत्र महोत्सवाचा रविवार, 29 रोजी समारोप करण्यात आला.

भवरलाल जैन व कविवर्य ना.धों.महानोर यांच्या मैत्रीला समर्पित असा हा महोत्सव होता. समारोप प्रसंगी आमदार राजू मामा भोळे, उद्योजक नितीन इंगळे, प्रीती अग्रवाल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रध्दांजली वाहून कार्यक्रम सुरू करण्यात आला.

महोत्सव प्रमुख स्वरूप लुंकड, डॉ.रेखा महाजन, मानसी गगडाणी, विनोद पाटील, नारायण बाविस्कर, मंजुषा भिडे उपस्थित होते. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विनोद अजनाडकर, मंगेश कुलकर्णी, नेहा पवार, प्रवीण पाटील, अनिल चौधरी, अक्षय नेहे, विकास वाघ, प्रा.मनोज पाटील, जय सोनार, गणेश सोनार, अभिजीत पाटील आदींनी परिश्रम घेतले.


कॉपी करू नका.