जळगावात अपघातात मालिका कायम : मेस चालकाचा ट्रॅक्टर धडकेत मृत्यू


Series of accidents continues in Jalgaon : Mess driver dies in tractor collision जळगाव (9 जानेवारी 2025) : शहरात अपघाताची मालिका कायम असून पुन्हा एका दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला आहे. खोटेनगर जवळ ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत मेस चालक असलेला दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात बुधवारी रात्रीच्या सुमारास घडला.

काय घडले नेमके ?
पंकज शालीग्राम शर्मा (प्रेम नगर, जळगाव) हे मेस चालक असून ते बधुवारी रात्री आठच्या सुमारास विद्यापीठातून आपल्या घरी येत असताना भरधाव वेगाने धावणार्‍या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, हा अपघात झाल्यावर येथूनच जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित हे तेथून जात होते. त्यांनी तत्काळ पंकज शर्मा यांना रुणालयात दाखल केले. तथापि, याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. यामुळे कालिका माता चौकातील दुर्घटनेच्या नंतर उपाययोजना न करण्यात आल्यामुळे हायवेने पुन्हा एका निष्पाप नागरिकाचा बळी घेतल्याने जनभावना पुन्हा संतप्त झाल्या आहेत.


कॉपी करू नका.