यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण संधी
न्यूज डेस्क । जळगाव (2 फेब्रुवारी 2025) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि रोजगार वाढीस चालना देणारा असून, जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून देणारा आहे.
या अर्थसंकल्पातील धन-धान्य कृषी योजना जिल्ह्यातील शेतकर्यांच्या उत्पादनवाढीसाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी जळगावचा समावेश होण्याची शक्यता आहे. जळगाव कापूस उत्पादक जिल्हा असल्याने 5 वर्षांची कापूस उत्पादनवाढ योजना महत्त्वाची ठरेल. तूर, उडीद आणि मसूर या डाळींच्या उत्पादनवाढीसाठी नवीन योजना सुरू होणार. आहे शेतीसाठी अल्प मुदतीच्या कर्जाची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.जल जीवन मिशन योजना 2028 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

सूक्ष्म उद्योजकांसाठी पाच लाख पर्यंत क्रेडिट कार्ड सुविधा:असेल पहिल्यांदाच उद्योग सुरू करणार्या महिला आणि मागासवर्गीय उद्योजकांसाठी 2 कोटींपर्यंत कर्ज योजनेसह प्रक्रिया उद्योगासाठी जळगावच्या केळी, डाळ आणि कापूस प्रक्रियेसाठी मदत मिळण्याची शक्यता.आहे शहरांचा विकास आणि पुनर्रचना योजना: एक लाख कोटींच्या ‘सिटीज अॅज ग्रोथ हब’ योजनेचा लाभ जळगावसारख्या शहरांना मिळू शकतो.
वीज वितरण सुधारणा योजना
राज्यांतर्गत वीज वितरणासाठी प्रोत्साहन दिले जाणार उडाण योजनेच्या विस्तारात जळगावला नवीन हवाई संपर्क मिळू शकतो.
10,000 नवीन जागा वाढल्यावर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी संधी.मिळेल 2025-26 चा अर्थसंकल्प जळगाव जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी विकासाच्या संधी निर्माण करणारा आहे. जिल्ह्याच्या कृषी, उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण व आरोग्य क्षेत्राच्या वाढीसाठी या योजनांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.
