खाजगी क्षेत्रातील कामगारांना पूर्ण पगार मिळणार
शासनाने काढला आदेश : सर्व खासगी आस्थापने, कारखाने, कंपन्या, दुकाने आदींमधील कामगारांना दिलासा
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभेमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर खाजगी, वाणिज्य, औद्यगिश क्षेत्रातील कामगार आणि कर्मचारी यांना घरी बसविण्यात आले आहे. या सर्व कंपन्या लॉकडाऊन काळात बंद राहणार आहेत. तसेच, परीस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन कुठल्याही कामगाराची पगार कपात करू नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटल्यानंतर या संदर्भात आता शासनाने आदेश जाहीर केल्याने खाजगी कर्मचार्यांना दिलासा मिळाला आहे.
शासनाने आदेश केला जारी
31 मार्च रोजी शासनाने आदेश जारी केला असून त्यानुसार, कोविड 19 विषाणूचा प्रादुर्भाव – लॉकडाऊन कालावधीत बेघर/विस्थापित कामगार व परराज्यातील अडकलेले कामगार यांच्या वेतनात अथवा मजुरीत कोणतीही कपात करु नये. तसेच, त्यांना कामावरुन कमीही करु नये,” असे आदेशच शासनाने दिले आहेत. राज्य सरकारचा हा आदेश, महाराष्ट्रातील सर्व निमशासकीय, औद्योगिक, वाणिज्यीक, व्यापारी व दुकाने यांना लागू असणार आहे. दरम्यान, संकट येतं आणि जातं. पण, माणुसकी सोडू नका. हे संकट जाईल. त्यामुळे ज्याचं पोट हातावर आहे, त्याचं किमान वेतन कापू नका’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच सर्वच उद्योजक आणि कंपन्यांना केले होते.

