जळगाव जिल्हापेठ हद्दीतून दोन दुचाकी लांबवल्या


जळगाव (25 मार्च 2025) : सुमारे 45 हजार किंमतीची होंडा शाईन तसेच सुमारे 25 हजार किंमतीची होंडा अशा दोन दुचाकी चोरट्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरून नेल्या. या प्रकरणी वाहनधारकांच्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

नयन भीमराव सदांशिव (25, मूळ रा. भीमनगर, अकोला, ह.मु. शासकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव) हे प्रशिक्षणार्थी डॉक्टर आहेत. यांच्या मालकीची 25 हजार रु. किमतीची होंडा दुचाकी (एम.एच.30 बी.ई.0035) ही 20 मार्च रोजी रात्री आठ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सिव्हिल सर्जन यांच्या ऑफिससमोर पार्किंग केली होती. चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी तक्रारीनुसार शनिवारी (22 मार्च) जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रवींद्र ठाकरे हे करीत आहेत.

शेख उसामा शेख नसीम (24, रा.तोंडापूर, ता.जामनेर) हे त्यांच्या मालकीची सुमारे 45 हजार रुपये किमतीची दुचाकी होंडा शाईन (एम.एच. 20 एफ.क्यू.9728) ने शुक्रवार, 21 मार्च रोजी रात्री नऊ वाजता शहरातील नायक हॉस्पिटल येथे आले. गेटच्या बाजूला दुचाकी लावून ते कामासाठी निघून गेले. रात्री 9.30 वाजता ते आले असता त्यांना दुचाकी दिसली नाही. परिसरात शोध घेतला असता तपास लागला नाही. या प्रकरणी तक्रारीनुसार शनिवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !