राज्यातील शेतकर्यांसाठी गुड न्यूज : 64 लाख कष्टकर्यांच्या खात्यात जमा होणार तब्बल 2555 कोटी
महाराष्ट्र सरकारकडून खुशखबर ! विमा कंपन्यांना देय वाट्यास शासनाकडून मान्यता

जळगाव (28 मार्च 2025) : राज्यभरातील कष्टकरी शेतकर्यांना शासनाने गुड न्यूज दिली आहे. राज्यातील तब्बल 64 लाख शेतकर्यांच्या खात्यावर दोन हजार 555 कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून जमा होणार आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकर्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून 2 हजार 852 कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. मागील विविध हंगामांतील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. शेतकर्यांना थेट लाभ मिळणार आहे, असे राज्याचे कृषी मंत्री ड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

असे मिळतील पैसे
1) खरीप 2022 आणि रब्बी 2022-23 या हंगामांसाठी रु. 2.87 कोटी, खरीप 2023 साठी रु. 181 कोटी रुपये भरपाई मिळेल.
2) रब्बी 2023-24 साठी रु. 63.14 कोटी आणि खरीप 2024 साठी रु. 2308 कोटी इतकी नुकसान भरपाई शेतकर्यांना वितरित होणार आहे.
3) राज्यातील 64 लाख लाभार्थी शेतकर्यांना मिळून एकूण रु. 2 हजार 555 कोटी रकमेचा लाभ होणार आहे.
लवकरच शेतकर्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार
शासनाने विमा कंपन्यांना निधी वितरित केलेला आहे. नुकसान भरपाईची रक्कम लवकरच शेतकर्यांच्या खात्यात जमा होईल, असे कृषि मात्री माणिकराव कोकाटे म्हणाले.