भोरगाव लेवा पंचायत भुसावळ विभागाची युवक कार्यकारणी जाहीर
सागर वाघोदे अध्यक्षपदी तर अमोल महाजन यांची सचिवपदी निवड

Youth executive committee of Bhorgaon Leva Panchayat Bhusawal division announced भुसावळ (21 एप्रिल 2025) : भोरगाव लेवा पंचायत विभाग भुसावळ युवक मंडळाची स्थापना करण्यात आली. यावेळी भोरगाव लेवा पंचायत भुसावळ विभाग अध्यक्ष सुहास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली भोरगाव लेवा पंचायत भुसावळ विभागाची युवक मंडळाची सुभाषचंद्र भंगाळे आणि धीरज पाटील यांनी कार्यकारणी जाहीर केली.
अध्यक्ष सागर वाघोदे, सचिव अमोल महाजन, सहसचिव शेखर धांडे, उपाध्यक्ष पवन बाक्षे, सुमित बर्हाटे, सागर सरोदे, शिशिर जावळे, जीवन वारके, पवन भोळे, खजिनदार प्रवीण पाटील, सहखजिनदार अश्विन लोखंडे, कार्यकारणी सदस्य अमोल पाटील, गौरव महाजन, ललित भोळे, यश फालक, वरद फालक, श्रेयस इंगळे, विकास पाटील, हर्षल बोरोले, निलेश भोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विविधांगी कार्यक्रम राबवणार
समाजातील तरुणांना नवीन दिशा मिळेल अश्या प्रकारचे कार्यक्रम भविष्यात राबविले जातील तसेच सदस्य नोंदणीचा कार्यक्रम पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे.
