यावल पोलिसांची कामगिरी : चोरीच्या दोन दुचाकीसह आडगावातील चोरटा जाळ्यात
Yawal Police Achievement : Thief from Adgaon Apprehended with Two Stolen Two-Wheelers यावल (10 एप्रिल 2026) : यावल तालुक्यातील आडगाव या गावातील एका तरूणाकडे चोरीच्या दुचाकी असल्याची गोपनिय माहिती यावल पोलिसांना मिळाल्यानंतर संशयीताला चोरीच्या दोन दुचाकींसह पकडण्यात आले. आरोपीने धरणगाव येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर त्यास धरणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
आडगाव, ता.यावल येथील रहिवासी रुपेश अशोक मराठे (28) या तरुणाकडे चोरीच्या दुचाकी असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी सहा.पोलिस निरीरक्षक अजयकुमार वाढवे, हवालदार संदीप सुर्यवंशी, किशोर परदेशी, सचिन पाटील या पथकास गावात पाठवलेे. यावेळी तरुणाकडे चोेरीच्या दोन मोटरसायकल मिळून आल्या. यातील एक मोटरसायकलचा तपास घेतला असता ती धरणगाव येथुन चोरीस गेल्याचे उघडकीय आले तर दुसरी मोटारसायकल भडगाव येथुन चोरीस गेली होती. दोन्ही दुचाकी संबधीत पोलिसांमार्फत मुळ मालकास देण्यात आल्या.

संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने द्यावी माहिती
संशयीत रुपेश मराठे याला धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गोपनिय माहितीच्या आधारावर कारवाई करण्यात आली. ग्रामीण भागात अशा काही संशयीत गोष्टी नागरीकांच्या निर्दशनास आल्यास त्यांनी पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी केले आहे.


