एक लाखांचे लाच प्रकरण : जळगावातील लाचखोर पोलीस कर्मचार्याची पोलीस कोठडीत रवानगी
₹1 Lakh Bribery Case : Corrupt Police Personnel from Jalgaon Remanded to Police Custody भुसावळ (14 एप्रिल 2026) : तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल न करण्यासाठी तडजोडीअंती एक लाखांची लाच मागून ती स्वीकारताना जळगावच्या शनीपेठ पोलीस ठाण्याचा कर्मचारी विनोद पितांबर अहिरे यास सोमवारी दुपारी जळगाव एसीबीने अटक केली होती. संशयीताला न्यायालयात हजर केल्यानंतर एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या अर्जाची चौकशी आरोपी अहिरे यांच्याकडे होती. या प्रकरणात कोणतीही कायदेशीर कारवाई न करता अर्ज निकाली काढण्यासाठी आरोपीने दोन लाखांची लाच मागितली होती. तक्रारदाराने तत्काळ याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर सोमवार, 13 एप्रिल 2026 रोजी सापळा रचून विनोद अहिरे याला अटक करण्यात आली.










