जळगावात अल्पवयीन अत्याचारातून गर्भवती ; नराधमाला अटक


Minor in Jalgaon Becomes Pregnant After Sexual Assault ; Perpetrator Arrested जळगाव (16 एप्रिल 2026) : नात्यातील अल्पवयीनावर 34 वर्षीय नराधमाने अत्याचार केला व त्यातून पीडीता गर्भवती राहिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 34 वर्षीय संशयीताविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल होताच अटक करण्यात आली.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 2025 मधील दिवाळी सणाच्या सुमारे 15 दिवस अगोदर ही 16 वर्षीय पीडीता घरात एकटी असताना तिच्या मावसाने घरी येऊन तिच्यावर जबरदस्ती केली. या पहिल्या कृत्यानंतर नराधमाने मुलीला कोणालाही काही सांगितले तर जीवे ठार मारीन अशी धमकी देऊन तिची वाचा बंद केली. याच भीतीचा फायदा घेत त्याने पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केला.

पीडीता गर्भवती :संशयीताला अटक
या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले. तेथून तालुका पोलिस ठाण्यात मााहिती देण्यात आली व पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी मुलीचा जबाब घेतला असता, मावसाने अत्याचार केल्याचे सांगितले. मुलीच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला व संशयीताला अटक करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !