39 वर्षीय महिलेवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार


39-year-old woman raped on the pretext of marriage. पाचोरा (16 एप्रिल 2026) : 39 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयीताविरोधात गुन्हा
पीडीता शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करते. तिचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झालेला असताना संशयित आरोपी शेखर राजपूत याने तिच्याशी ओळख वाढवली. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन त्याने पीडितेचा विश्वास संपादन केला.

पोलीस रेकॉर्डनुसार, हा अत्याचार 10 जानेवारी 2020 पासून ते 2 एप्रिल 2026 पर्यंत सातत्याने सुरू होता. पाचोरा शहरातील पीडितेच्या वडिलांच्या घरी तसेच शहरातील ‘रविराज हॉटेल’ या ठिकाणी संशयिताने पीडितेवर अत्याचार केला. अखेर पीडित महिलेने धाडस करून 15 एप्रिल रोजी पाचोरा पोलीस गाठले आणि तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी शेखर राजपूत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण घायाळ करीत आहेत.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !