दीपनगरजवळ नादुरुस्त ट्रकवर मालवाहू वाहन आदळले : जळगावातील चालक ठार
Cargo Vehicle Crashes into Broken-Down Truck Near Deepnagar: Driver from Jalgaon Killedभुसावळ (17 एप्रिल 2026) : नादुरुस्त मालट्रक रस्त्यावर बेशिस्तपणे उभी करण्यात आल्याने त्यावर मालवाहू वाहन आदळल्याने झालेल्या अपघाता मालवाहू चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात नॅशनल हायवे रोड क्रमांक 53 नॅशनल हायवे 53 वरील दीपनगर-निंभोरा बुद्रूक गावाजवळील जनाब भंगार दुकानासमोर गुरुवारी रात्री 8.20 वाजेच्या सुमारास घडला. मयत अतुल नरेंद्र चौधरी (37, तळेले कॉलनी, ता.जळगाव) असे मयत चालकाचे नाव असून अज्ञात चालकाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
नादुरुस्त ट्रकने घेतला चालकाचा बळी
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालट्रक (क्रमांक जे.एच.10 सी.के.1978) हा नादुरुस्त झाल्यानंतर अज्ञात वाहन चालकाने नॅशनल हायवे रोड क्रमांक 53 नॅशनल हायवे 53 वरील दीपनगर-निंभोरा बुद्रूक गावाजवळील जनाब भंगार दुकानासमोर उभा केला. वाहन नादुरुस्त असल्याबाबत येणार्या-जाणार्या वाहनधारकांना दिसेल अशा पद्धत्तीने काही निशाणी लावणे क्रमप्राप्त होते मात्र वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण होईल, अशा पद्धत्तीने ट्रक लावून वाहन धारक निघून गेला व गुरुवारी रात्री 8.20 वाजेच्या सुमारास मालवाहू वाहन (एम.एच.19 सी.वाय.0243) ही येत असताना ती नादुरुस्त ट्रकवर आदळल्याने अतुल चौधरी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने भुसावळच्या ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आल्यानंतर अर्धा तासानंतर त्यांचा मृत्यू झाला. अपघात प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरोधात मृताचा भाऊ चंद्रशेखर नरेंद्र चौधरी (40, मुळ रा.आसोदा, ता.जि.जळगाव, ह.मु.दमन) यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.



