भडगाव हादरले : 22 वर्षीय तरुणाची गावठी कट्ट्यातून गोळी झाडून आत्महत्या


Bhadgaon Shaken : 22-Year-Old Youth Commits Suicide by Shooting Himself with a Country-Made Pistol भडगाव (19 एप्रिल 2026) : भडगावातील खुशाल आप्पा नगरातील रहिवासी असलेल्या 22 वर्षीय तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. स्वप्निल प्रवीण शिंपी (22) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही.

खोलीत केली आत्महत्या
स्वप्निल सकाळी आपल्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत नेहमीप्रमाणे वावरत होता मात्र दुपारच्या सुमारास त्याला एक फोन आला. हा फोन आल्यानंतर स्वप्निल अचानक अस्वस्थ झाला. कोणालाही काहीही न सांगता तो आपल्या खोलीत गेला आणि त्याने आतील बाजूने दरवाजा बंद करून घेतला. काही क्षणांतच खोलीतून गोळीबाराचा मोठा आवाज आला.


आवाज ऐकताच घाबरलेल्या नातेवाईकांनी धाव घेत खिडकीतून आत पाहिले असता, स्वप्निल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. कुटुंबीयांनी तातडीने दरवाजा तोडून त्याला बाहेर काढले आणि उपचारासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांकडून कट्टा व मोबाईल जप्त
घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी पिस्तूल आणि स्वप्निलचा मोबाईल फोन जप्त केला आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !