पहूरच्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू
Two-wheeler rider from Pahur dies in accident जामनेर (19 एप्रिल 2026) : अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पहूरमधील रहिवासी नरेंद्र वसंत बडगुजर (वय-45) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात चालक आपले वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला.
असा घडला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, मयत नरेंद्र बडगुजर हे शुक्रवार, 3 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास आपली बजाज प्लॅटिना मोटारसायकल (एम.एच.19 ई.क्यू.8354) घेऊन जामनेरकडून पहूरच्या दिशेने घरी निघाले असताना भवानी फाटा परिसरातील छत्रपती संभाजी नगर ते जळगाव महामार्गावर, मळपिंप्री शिवारात एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात नरेंद्र बडगुजर यांचा दुदैवी मृत्यू झाला.



