अक्कलकुव्यातील तीन चिमुकल्यांचा नर्मदा डोहात बुडून मृत्यू


Three young children from Akkalkuva drown in the Narmada River अक्कलकुवा (10 जून 2026) : नर्मदा डोहात अंघोळ करण्यासाठी गेलेल्या तीन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवार, 9 रोजी दुपारी अतिदुर्गम गमनचा केलिपाडा गावालगतच्या नर्मदा नदीतील डोहात घडली. सुनील वसावे (6), निलेश वसावे (7) व शुभम असावे (6) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत.

अंघोळीसाठी गेल्यानंतर दुर्घटना
गमनचा केलिपाडा येथील काही मुले मंगळवारी दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास नर्मदा नदीच्या डोहात अंघोळीसाठी गेली होती. उन्हाचा कडाका असल्याने मुले पाण्यात उतरली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तीन बालके खोल पाण्यात गेली व काही क्षणांतच ती पाण्यात बुडू लागताच सोबतच्या मुलांनी आरडा-ओरड केली. मुलांच्या आवाजाने ग्रामस्थांनी पटनास्थळी धाव घेत शोधकार्य शुरू केले,

स्थानिकांच्या मदतीने तिन्ही बालकांचा शोध घेण्यात आला मात्र त्यांना बाहेर काढेपर्यंत उशीर झाला होता. या दुर्घटनेत सुनील खेत्या वसावे, नितेश अंबर्‍या वसावे व शुभम कैलास वसावे यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह मोलगी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !