मध्य रेल्वेद्वारा नागपूरसह मडगाव दरम्यान विशेष गाड्या धावणार


भुसावळ (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026) : मध्य रेल्वेद्वारे आगामी गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी नागपूर आणि मडगांव दरम्यान गणपती विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे. प्रवाशांना गर्दीच्या हंगामात मोठा दिलासा या गाड्यांमुळे मिळणार आहे.

अशा धावणार विशेष गाड्या
गाडी क्रमांक 01139 विशेष गाडी दिनांक 19 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2026 पर्यंत दर बुधवारी नागपूर येथून 11.45 वाजता सुटेल आणि मडगांव येथे शुक्रवार रोजी 5.30 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01140 विशेष गाडी दिनांक 18 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर 2026 पर्यंत दर मंगळवार रोजी मडगांव येथून सात वाजता सुटेल आणि नागपूर येथे बुधवारी 9.25 वाजता पोहोचेल.

या गाडीला वर्धा, पुलगांव, धामणगांव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी स्थानकावर थांबा असेल.

या गाडीला तीन वातानुकूलित तृतीय, 8 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन असेल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !