सातोद गावातील विवाहिता बहिण व बालकासह बेपत्ता


यावल (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026) : यावल तालुक्यातील सातोद या गावातून 20 वर्षीय विवाहिता आपल्या सोबत दीड वर्षीय मुलगा आणि तिची 17 वर्षीय बहीण यांना घेऊन घरात कोणाला काही न सांगता बाहेर पडून बेपत्ता झाली. या तिघांचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तिघे कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली.

काय आहे प्रकरण ?
सातोद गावातील रहिवासी अश्विनी महिंद्र भील (मूळ रहिवासी तोंदे, ता. शिरपूर) ही विवाहिता आपल्या सोबत तिचा दीड वर्षीय मुलगा रोशन महेंद्र भिल आणि 17 वर्षीय बहीण सारिका एकनाथ भिल या दोघांना सोबत घेऊन 15 ऑगस्ट रोजी घराच्या बाहेर गेली होती मात्र त्यानंतर ती नंतर घरी परत आलीच नाही. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला मात्र हे तिघे कुठेच मिळून आले नाही म्हणून यावल पोलिसात युवराज मोरे यांच्या खबरीवरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेश महाजन करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !