मध्यप्रदेशातील श्री क्षेत्र ओंकारेश्वर ते श्रीक्षेत्र तारकेश्वर महादेव, यावल दरम्यान कावड यात्रा उत्साहात

185 किलोमीटरचे अंतर सहा दिवसात पार करीत सोमवारी शहरात दाखल झाली कावड यात्रा


यावल (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : सालाबादप्रमाणे यावर्षी देखील यावल शहरातील जय बजरंग ग्रुप बोरावल गेट येथील भाविकांनी मध्यप्रदेशातील श्री क्षेत्र ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग महादेव मंदिर येथून थेट यावल शहरातील तीर्थक्षेत्र श्री तारकेश्वर महादेव मंदिरापर्यंत कावड यात्रा काढली. या कावड यात्रेला 12 ऑगस्ट रोजी सुरुवात झाली होती. सहा दिवसाचा प्रवास करून ही कावड यात्रा सोमवारी सकाळी यावल शहरात दाखल झाली. शहरात या कावड यात्रेतील सहभागी भाविक, भक्तांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. संपूर्ण शहरातून भव्य मिरवणूक काढत श्री तारकेश्वर महादेव मंदिरावर जलाभिषेक करून या कावड यात्रेचा समारोप करण्यात आला.

185 किलोमीटरचा प्रवास
यावल शहरातील जय बजरंग ग्रुप बोरावल गेट येथील भाविक, भक्त दरवर्षी श्रावण मासात मध्य प्रदेशातील तीर्थक्षेत्र ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग महादेव मंदिरात जातात आणि तेथून पवित्र जल कावळमध्ये घेऊन ते तेथून कावडयात्रात काढतात. यावर्षी देखील मोठ्या संख्येत भाविक, भक्तांनी या कावड यात्रेत सहभागी होऊन 12 ऑगस्ट रोजी तीर्थक्षेत्र ओंकारेश्वर येथून कावड यात्रा सुरू केली आणि 185 किलोमीटरचा प्रवास पार करून पाच दिवस मुक्काम घेत ही कावड यात्रा सोमवारी सकाळी यावल शहरात दाखल झाली.

महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक
या कावड यात्रेतील सहभागी भाविक, भक्तांचे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. व सवाद्य शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शहरातील विविध मान्यवरांनी या कावड यातील सहभाग घेतला व शहरातील श्री तारकेश्वर महादेव मंदिरावर नेऊन महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक करून या कावड यात्रेचा समारोप करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !