रॅगिंग करणे हा गुन्हाच : भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात अ‍ॅड.प्रिया अडकमोल

पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात अँटी रॅगिंगवर कायदेविषयक मार्गदर्शन


भुसावळ (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : शहरातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात युवती कल्याण समिती, महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार समिती, भुसावळ तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अँटी रॅगिंगवर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. रॅगिंग करणे हा गुन्हाच, असल्याचे यावेळी अ‍ॅड.प्रिया अडकमोल म्हणाल्या.

यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, उपप्राचार्य प्रोफेसर डॉ.जी.आर.वाणी, प्रमुख वक्ते अ‍ॅड.प्रिया अडकमोल, पत्रकार उज्वला बागुल तसेच त्यांचे सहकारी रुपाली नेवे, नेहा जावरे, युवती कल्याण समिती प्रमुख प्रा.डॉ.गौरी पाटील, महिला तक्रार निवारण व विशाखा समिती प्रमुख प्रा.डॉ.विद्या पाटील, शी बॉक्स – अंतर्गत तक्रार समिती प्रमुख प्रा.डॉ.स्वाती फालक उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. प्रास्ताविक प्रा.डॉ.गौरी पाटील यांनी केले.

उज्वला बागुल यांनी विधी सेवा विषयक प्राथमिक स्वरूपाची माहिती दिली. या संदर्भात अनेक शिबिरे तसेच उपक्रम जिल्हा आणि गाव स्तरावर राबवण्यात येतात अशी माहिती दिली.

रॅगिंग करणे हा गुन्हाच
प्रमुख वक्ता अ‍ॅड. प्रिया अडकमोल यांनी अँटी रॅगिंग संदर्भात माहिती देताना रॅगिंग सहन करणे हा सुद्धा एक गुन्हा आहे असे प्रतिपादन केले. रॅगिंग ही सीनियर होण्याची परंपरा नाही, असे त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगताना त्याचे होणारे दुष्परिणाम तसेच रॅगिंग घेणारे आणि त्याचे त्यांच्या मानसिक आरोग्यावर तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर होणारे दुष्परिणाम सुद्धा त्यांनी विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले.

प्राचार्य डॉ. बी. एच. बर्‍हाटे यांनी अध्यक्षीय भाषणात विदयार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून दुसर्‍यांना आपल्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी वर्तणूक ठेवावी हे सांगितले.

यांनी घेतले परिश्रम
सूत्रसंचालन प्रा.डॉ.पूनम महाजन तर आभार प्रा.डॉ. ममता पाटील यांनी मानले. समिती सदस्य प्रा.डॉ.स्मिता चौधरी, प्रा.डॉ.ममता पाटील, प्रा.डॉ.रश्मी शर्मा, डॉ.निलीमा पाटील, प्रा.डॉ.संगीता भिरुड, प्रा.डॉ. पूनम महाजन, प्रा.अर्चना भालेराव, प्रा.प्रणिता राणे, प्रा.स्वाती शेळके, प्रा.स्मिता बेंडाळे, प्राजक्ता बागुल, श्रीमती शरयू भोळे यांचे सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी, संगणक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !