भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा व प्लेसमेंट सेल समितीचे उद्घाटन


भुसावळ (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात शुक्रवार, 21 रोजी स्पर्धा परीक्षा व प्लेसमेंट सेल समितीचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून भुसावळ येथील संकल्प अकॅडमीचे संचालक आकाश जगन्नाथ कनोजे होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.मीना चौधरी होत्या.

स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन
आकाश कनोजे यांनी पदवी काळात स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, शासनातर्फे घेण्यात येणार्‍या एमपीएससी, युपीएससी, बँकिंग, पोलीस भरती, तलाठी, रेल्वे, ग्रामसेवक इत्यादी विविध स्पर्धा परीक्षांची ओळख, स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, अभ्यास कसा करावा अशी सखोल माहिती विद्यार्थिनींना दिली.

प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा व प्लेसमेंट सेल समितीचे अध्यक्ष प्रा.संदीप नेतनराव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सना खान यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा.गिरीश सरोदे, प्रा.विनोद भालेराव, प्रा.निलेश गुरुचल यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचा महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील बहुसंख्य विद्यार्थिनींनी लाभ घेतला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !