सकल लेवा पाटीदार समाजातील उपवर-वधूंना सूचीसाठी नाव नोंदणीचे आवाहन


भुसावळ (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : सकल लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींची शैक्षणिक, कौटुंबिक व व्यावसायिक माहिती असलेली वधू-वर सूची 2026-27 प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन समाजबांधवांना करण्यात आले आहे.

ही वधू-वर सूची लेवा नवयुग संघ, जळगाव तसेच भोरगाव लेवा पंचायत, पाडळसे विभाग, भुसावळ यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येणार आहे.

या सूचीत नाव नोंदणीसाठीचे अर्ज आपले परिवार सार्वजनिक वाचनालय, लक्ष्मीनगर, वांजोळा रोड, भुसावळ येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. समाजबांधवांनी दररोज सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यान संबंधित ठिकाणी जाऊन नाव नोंदणी अर्ज प्राप्त करावेत, असे आवाहन प्रमोद सरोदे यांनी केले आहे.

सदर वधू-वर सूचीत नोकरदार, उच्चशिक्षित, व्यावसायिक, शेतकरी, शेतमजूर, प्रौढ, दिव्यांग तसेच घटस्फोटित विवाहेच्छुक युवक-युवतींनी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !