भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात वाणिज्य व नियोजन मंडळाचे उद्घाटन


भुसावळ (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : शहरातील श्रीमती प.क. कोटेच्या महिला महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विभागातर्फे ‘वाणिज्य व नियोजन मंडळाचे’ उद्घाटन सी.ए.मुकेश अग्रवाल यांच्याहस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.मीना चौधरी होत्यो. कार्यक्रमाच्या संयोजक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. राजकुवर गजरे व अर्थशास्त्र विभागाच्या डॉ.उज्वला महाजन यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. राजकुवर गजरे यांनी वाणिज्य व नियोजन मंडळाच्या मागील वर्षभरातील कार्यक्रमाची माहिती दिली व वाणिज्य विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने या विषयावर बोलताना विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व व व्यक्तिमत्व विकास याविषयी मार्गदर्शन केले.

स्वतःतील उणिवा मोठे आव्हान
सीए मुकेश अग्रवाल यांनी ‘वाणिज्य विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने’ या विषयावर चर्चा करताना आज वाणिज्य विद्यार्थ्यांसमोर बाहेरील जगांपेक्षा स्वतःमध्ये असलेल्या उणिवा या सर्वात मोठे आव्हान असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना परंपरागत ज्ञानासोबत स्वतःमध्ये कौशल्य विकसित करण्याचा सल्ला दिला.

प्रभारी प्राचार्य डॉ.मीना चौधरी यांनी वाणिज्य विभागाला शुभेच्छा दिल्या व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा.सुरज हेडा यांनी तर आभार अर्थशास्त्र विभागाच्या डॉ.उज्वला महाजन यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.पंकज फालक, प्रा.रविकांत वासनिक, प्रा.रुखसाना शेख, प्रा.लता साळुंखे व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !