रावेर पोलिसांची मोठी कारवाई : गावठी कट्टा, दोन जिवंत काडतूसासह स्थानिक आरोपी जाळ्यात
रावेर (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : रावेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या स्थानिक आरोपीला गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसांसह ताब्यात घेतले. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली. कृष्णा दत्तू पाटील (20, रोकडा हनुमान मंदिर, रावेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे
गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेरचे निरीक्षक संदीप पाटील यांना गावठी कट्टा बाळगणार्या संशयीताबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. 20 रोजी बसस्थानक परिसरातून कृष्णा दत्तू पाटील (20, रोकडा हनुमान मंदिर, रावेर) या संशयीताला पथकाने ताब्यात घेतल्यानंतर झडतीदरम्यान त्याच्याकडून 25 हजार रुपये किंमतीचा कट्टा व एक हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर निरीक्षक संदीप पाटील, सहा.निरीक्षक हरिदास बोचरे, गुन्हे शोध पथकातील हवालदार समाधान ठाकूर, कॉन्स्टेबल सुकेश तडवी, श्रीकांत चव्हाण, विकार शेख, प्रमोद पाटील, विशाल पाटील, संभाजी बिजागरे आदींच्या पथकाने केली.


