किनगावात गुरांच्या गोठ्यात आडगावच्या तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
यावल (शनिवार, 22 ऑगस्ट 2026) : यावल तालुक्यातील किनगाव या गावात हॉटेल जत्राच्या मागे असलेल्या एका गुरांच्या गोठयात 23 वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गणेश हाजी बारेला (23 रा.आडगाव) असे मृताचे नाव आहे.
गुरांच्या गोठ्यात आत्महत्या
मयत तरुण गणेश हा आडगाव ता. यावल येथील रहिवासी आहे तर किनगावातील हॉटेल जत्राच्या पाठीमागे असलेल्या गुरांच्या गोठ्याने तरुणाने विषारी द्रव्य प्राशन केले. तरुण बेशुद्धावस्थेत तेथे आढळल्याने तातडीने त्याला तेथून ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे यांनी तपासणी करून मयत घोषित केले.
या प्रकरणी यावल पोलिसात हाजी नानसिंग बारेला यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.


