भुसावळ शहर पोलीस ठाण्याबाहेर झोंबाझोंबी : नऊ संशयीतांविरोधात गुन्हा


भुसावळ (रविवार, 23 ऑगस्ट 2026) : कुठल्यातरी कारणातून वाद झाल्यानंतर तक्रारदार भुसावळ शहर ठाण्यात आल्यानंतर उभयंतांमध्ये पुन्हा वाद झाला व त्यांच्यात पुन्हात झोंबाझोंबी झाल्याची घटना शनिवार, 22 रोजी सकाळी 11.30 वाजता घडली. या प्रकरणी 9 जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
हवालदार सुनीता मधुकर लेले यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी या सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत सीसीटीएनएस ड्युटीवर होत्या. यावेळी तक्रार देण्यासाठी काही जण आल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले व ड्युटीवरील पोलिस कर्मचार्‍यांसमोर आरडाओरड, शिविगाळ करीत त्यांनी मारामारी केली.

नऊ संशयीतांविरोधात शहर पोलिसात गुन्हा
हवालदार सुनीता लेले यांच्या तक्रारीवरून नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात तीन अल्पवयींना समावेश आहे. शहर पोलीस ठाण्याबाहेर झालेल्या मारहाणीत मोठी खळबळ उडाली. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवन नायमाने करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !