साकेगावातील श्री स्वामिनारायण गुरुकुलमध्ये बहिणाबाईंना जयंतीनिमित्त अभिवादन


भुसावळ (सोमवार, 24 ऑगस्ट 2026) : साकेगावातील येथील श्री स्वामिनारायण गुरुकुलमध्ये लोककवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका उज्वला धांडे होत्या. मुख्याध्यापिका प्रणिता चौधरी, मुख्याध्यापक मनोज भोसले, मुख्याध्यापक अभिष सरोदे उपस्थित होते.

कवितांना मिळाली उत्स्फूर्त दाद
यावेळी विद्यार्थिनींनी बहिणाबाईंच्या सुंदर कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. बहिणाबाईंच्या जीवन कार्यावर प्रभावी भाषणे दिली. अध्यक्षीय भाषणातून बहिणाबाईंच्या साध्या, सहज आणि जीवनाला स्पर्श करणार्‍या काव्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. सूत्रसंचालन संगीता जंगले यांनी केले. बहिणाबाईंच्या काव्य विचारांनी कार्यक्रमाला साहित्यिक आणि प्रेरणादायी उंची प्राप्त झाली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !