भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात ‘जिमखाना डे’ उत्साहात
भुसावळ (सोमवार, 24 ऑगस्ट 2026) : शहरातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयातील जिमखाना विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे या शैक्षणिक वर्षातील जिमखाना डे 20 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात आला. या दिवशी महाविद्यालयातील विविध क्रीडा प्रकारामध्ये विद्यापीठ, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
गुणवंत खेळाडूंचा गौरव
विद्यार्थ्यांनी टेनिस, क्रिकेट, लॉन टेनिस बॅडमिंटन, मल्लखांब व योगविद्या,शरीर सौष्ठत्व आदी प्रकारामध्ये घवघवीत यश संपादन केल्याने त्यांचा गुणगौरव करण्यात आला. संपूर्ण शैक्षणिक वर्षातील क्रीडा संबंधित उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सचिन जोहरे, द्वितीय पारितोषिक तुषार जोहरे तर तृतीय पारितोषिक तेजस झोपे, रिशा चंद्रा आणि मुशरब खान यांना विभागून देण्यात आले.



यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे होते. उपप्राचार्य डॉ.डी.एन.पाटील व समिती सदस्य मंचावर उपस्थित होते. सूत्रसंचालन जिमखाना विभागप्रमुख डॉ.आनंद उपाध्याय यांनी केले. यशस्वीतेसाठी जिमखाना समिती सदस्य अख्तर खान, डॉ.पी.एच.इंगोले, डॉ.ए.जे.हिवाळे, डॉ.एस. डी.येवले, डॉ.एम.जे.जाधव, डॉ.यु.ए.फेगडे, डॉ.एच.व्ही.पाटील डॉ.एस. आर.भिरूड, डॉ.पी.एम.महाजन, डॉ.एस.एस.कोलते आणि सर्व क्रीडा प्रेमी विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

